Advertisement/s

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क,

चिंचवड, अँटो क्लस्टर समोर, पुणे ४११ ०१९

जाहिरात क्रमांक  - १/२०१८

 

               पिंपरी चिंचवड सायन्स पार्क कंपनी मार्फत चिंचवड येथे ऑटोक्लस्टर समोर बांधण्यात आलेल्या प्रादेशिक विज्ञान केंद्र प्रकल्पासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ( Chief Executive Officer ) या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

अटी व शर्ती

1) सदरचे पद कंत्राटी ( Contract ) पद्धतीने भरण्यात येईल.

2) शैक्षणिक पात्रता व अनुभवः-

    शैक्षणिक पात्रता -  मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरीता विज्ञान / अभियांत्रिकी / वैद्यकीय शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.

   अनुभव अ) शासकिय किंवा निमशासकीय सेवेत गटातील पदावरील प्रशासकीय कामकाजाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. विज्ञान अथवा विज्ञान संशोधन / विज्ञान विकास क्षेत्रातून व प्रशासकीय अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

               आ) खाजगी नोगकरीमध्ये विज्ञान अथवा विज्ञान संशोधन / विज्ञान विकास क्षेत्रात ५ वर्षाचा अनूभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

3) आरक्षण उपरोक्त पद खुल्या प्रवर्गातून भरावयाची आहेत.

4) उमेदवाराने को-या कागदावर हस्तलिखित अथवा टंकलिखित अर्ज स्वतःचे नांव, पत्ता, शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, जात, पोटजात, अवगत असलेल्या भाषा विशेष बाबी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो अर्जावर चिटकवू आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रती सक्षम अधिका-यांनी साक्षांकित केलेल्या प्रतींसह अर्ज चेअरमन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांचे नांवे अर्ज खाली नमुद e-mail वर ( अर्ज फोटोसह व सर्व संबंधीत कागदपत्रे स्कॅन करुन ) mail करणेत यावा. समक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. १०/०२/२०१८ पूर्वी ई-मेल करणेत यावेत. अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड, संपूर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ( मोबाईल नंबर ) नमुद करावा.

5) प्रस्तुत भरती प्रक्रीया कोणत्याही टप्प्यावर स्थगीत करणेचे अधिकार चेअरमन, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क  यांनी राखून ठेवले आहेत. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी / भ्रमणध्वनीवरुन मौखिक परिक्षेची तारीख कळविण्यात येईल.

6) उपरोक्त पदाकरीता लागु करण्यात आलेली वेतन, पदाची कर्तव्ये व जबाबदारी, याबाबत चेअरमन, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क कंपनी यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल व तो उपरोक्त पदाकरीता निवड होणा-या  उमेदवारावर बंधनकारक राहील.

7) नियुक्त झालेल्या उमेदवाराचा परीविक्षाधिन कालावधी रुजू आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षासाठी राहिल. उमेदवारांनी एक वर्षाचा कामकाजाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पिंपरी चिंचवड सायन्स पार्क संचालक त्यांचे बाबतीत जो निर्णय घेतील तो त्यांच्यावर बंधन कारक राहील.

8) पिंपरी चिंचवड सायन्स पार्क संचालक मंडळानी उपरोक्त नमूद सर्व प्रकारच्या प्रक्रियेत करावयाचे बदल व घ्यावयाचे निर्णय याचे हक्क राखून ठेवले आहेत.

 

                                                                                                             सही/-

                                                                                                           चेअरमन

Email – p.tupe@pcmcindia.gov.in                                         पिंपरी चिंचवड सायन्स पार्क

क्रमांक – २६२/२०१७-१८                                                                चिंचवड ४११०१९

दिनांक  १०/०१/२०१८